(जाकादेवी/संतोष पवार)
रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती व भारतीय बौद्ध महासभेतर्फे (मिराताई आंबेडकर प्रणित) दोन्ही संस्थांच्या वतीने विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सोमवार दि. ५ डिसेंबर रोजी रात्री ठीक १२ वाजता अभिवादन करण्यात आले.
रत्नागिरी तालुका बोध्दजन पंचायत समिती तालुका रत्नागिरी व भारतीय बौद्ध महासभा (मिराताई आंबेडकर प्रणित) तालुका शाखा रत्नागिरी या दोन्ही संस्थांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ५ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाळा अर्पण करून पंचशील ग्रहण करून दोन्ही संस्थांच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.
अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेता शिरगाव येथील स्वयंसेवक म्हणून विशाल कांबळे, सोहम कांबळे, स्वप्नील कांबळे, स्वप्नील कांबळे, अनिकेत जाधव संतोष सावंत, निकेतन कांबळे, अभिजीत कांबळे यांनी धम्म बांधवांना दर्शन घेणे सुकर होण्यासाठी उत्तम सहकार्य केले.
हा अभिवादन कार्यक्रम संयुक्त उत्सव कमिटीचे अध्यक्ष सामाजिक चळवळीतील धडाडीचे, कर्तबगार नेतृत्व अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी संयुक्त समितीचे सेक्रेटरी व्ही. बी. मोहिते, प्रितम आयरे, सहसचिव सुहास विनायक कांबळे, भगवान जाधव, तु. गो. सावंत, विजय आयरे, रत्नदिप कांबळे, शिवराज जाधव, विलास कांबळे, कृष्णा जाधव, दिपक जाधव, रविकांत पवार, दिनकर कांबळे, शरद सावंत.सी.ए.जाधव, संतोष सावंत, प्रशांत जाधव, सतिश कदम व विविध ग्रामशाखेचे व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, बौद्ध समाज बांधव व अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व अनुयायांना बौध्दजन पंचायत समिती शाखा व मिलिंद युवा मंडळ तोणदे यांनी मोफत चहा पुरविल्याने दोन्ही संस्थांच्यावतीने तोणदे शाखेला धन्यवाद दिले.