(संगलट /इक्बाल जमादार)
रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीतील केमिकल कंपनीत भीषण आग लागली. ब्लू जेट केमिकल कंपनीत (Blue Jet Healthcare company) लागलेल्या आगीत 11 कामगार अडकल्याची माहिती आहे. तर पाच कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी तिघांची प्रकृती काहीशी चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड ही कंपनी रायगड मधील महाड MIDC मध्ये आहे. या कंपनीत सकाळी 11 च्या सुमारास मोठा आवाज झाला. हा आवाज स्फोटाचं असल्याचं सांगण्यात येते.
गॅस गळतीमुळे आधी स्फोट झाला आणि मग आग भडकल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं आले आहे. सकाळी 11 च्या सुमारास ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस आणि महाडचे प्रांताधिकारी दाखल झाले आहेत. या स्फोटामुळे सगळीकडे धावपळ सुरु झाली. आधी गॅस गळती झाली की आधी स्फोट झाला याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळाली नाही. मात्र स्फोट आणि गॅस गळती सुरु झाल्यानंतर, सर्वत्र आग पसरू लागली.