कोरोना महामारीमध्ये रत्नागिरीतील कोविड रुग्णालयात रुग्णांच्या भोजन व्यवस्थेकरिता गत ३५ दिवस महाजनी फाउंडेशन तर्फे राष्ट्रीय सेवा समिती सहयोगाने शिवश्री हॉस्पिटल, कारवांचीवाडी, शासकीय रुग्णालय, रत्नागिरी व कुवारबाव कोविड सेंटर, रत्नागिरी येथे मोफत भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.
कै.शिवप्रसाद महाजनी यांची समाजाप्रतीची बांधीलकी आणि तळमळ यापासून प्रेरणा घेऊन 2013 ऑगस्ट मध्ये शिवप्रसाद महाजनी फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे.
दरवर्षी रक्तदान शिबीर , गुणवान विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य , समाजातील विविध घटकांसाठी योग शिबिरे या सारखे उपक्रम केले जातात. रुग्ण उपयोगी वस्तू नाममात्र भाडे स्वीकारून उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच सिव्हिल हॉस्पिटल आणि अन्य ठिकाणी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांना अल्प दरात किंवा मोफत जेवण उपलब्ध करून दिले जाते. या खेरीज वेळोवेळी होणाऱ्या अन्य संस्थांच्या सामाजीक कार्यात सहभागी होऊन योगदान दिले जाते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतूनच राष्ट्रीय सेवा समितीची निर्मिती झाली आहे.भारतीय तत्वावर नितांत श्रद्धा असलेली विशुद्ध चारित्र्यवान व त्यागमय पिढी निर्माण करणे त्यासाठी पूरक कार्य करणे व त्याच दृष्टिकोनातून संघ कामाच्या अनेक आयामांना सहाय्यभूत होतील असे काही उपक्रम ही समिती रत्नागिरी जिल्ह्यात समाजसेवेचे ब्रीद घेऊन राबवत आहे.संस्थेचा दैनंदिन कारभार चालवत असताना संस्थेच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या प.पु.माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी ग्राम विकास प्रकल्प गोळवली ज्यामध्ये गोळवली व धामणी या पंचक्रोशीचा चा संपूर्ण ग्रामीण विकास हा विषय केंद्रभूत ठेवूनच प्रकल्पाचे काम चालते.
त्याचबरोबर संस्थेची रत्नागिरीमध्ये अन्य स्थायी स्वरूपाची सेवाकार्य चालतात ज्यामध्ये आदर्श विद्यार्थी वसतिगृह झाडगाव,मुलींचे वसतिगृह सन्मित्र नगर, बाळासाहेब पित्रे योग्य प्रशिक्षण व संशोधन केंद्र झाडगाव अशा पद्धतीने सेवाकार्य राष्ट्रीय सेवा समितीच्या माध्यमातून सुरू आहेत. त्याच बरोबर अनेक सेवाउपक्रम समितीच्या माध्यमातून राबविले जातात.या सामाजिक उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.