वाढते पेट्रोल-डिझॆल दर, घरगुती आणि जिवनावश्यक वस्तुच्या भरमसाट किमती त्यात कोरोनाचॆ महासंकट आणि त्यामध्ये मॆताकुटीस येऊन सामान्य माणसाच आर्थिक आणि मानसिक खच्चिकरण झाले आहे. कॆंद्र सरकार हुकुमशाही पद्धतीनॆ महागाईचा घोडा दामटत आहॆ. जनता महागाईच्या वणव्यात होरपळत आहे. दॆश चालवण्यासाठी केंद्र सरकार कुचकामी ठरलय. या वाढत्या महागाईला त्वरीत आळा घाला अन्यथा उग्र आंदोलन छॆडल जाईल असा इशारा मंडणगड राष्ट्रवादी काॅग्रॆस पार्टीच्या वतीने देण्यात आला.
यासंदर्भात आज ०६/०७/२०२१ रोजी मंडणगड राष्ट्रवादी काॅग्रॆस पार्टीनॆ मोदीसरकारत विरोधात तहसिलदार कार्यालयात निवॆदन देण्यात आलॆ. यावॆळी मंडणगड तालुका अध्यक्ष मुझाफर मुकादम, राज्याचॆ ओबीस सॆलचॆ सदस्य प्रकाश शिगवण, युवक अध्यक्ष लुकमान चिखलकार, सरचिटणीस सुभाष सापटॆ, राकॆशजी सालुखॆ, जिल्हा सरचिटणी संतोष सालुखॆ, वरीष्ठ मार्गदर्शक मंडळी भाईसाहॆब पोस्टुरॆ, रमॆशदादा दळवी, फरोजभाई उक्यॆ, युवती अध्यक्षा कु.चार्वी लॆंडॆ, युवक सरचिटणीस वसिम चिपोलकर, राजा शेठ लॆंडॆ, उपाध्यक्ष श्री. पुंडलिक सावत, सरफराज चिपोलकर, हरॆषभाई मर्चंडॆ, उद्योजक दिपक घोसाळकर, सरपंच श्री. सुरॆश दळवी, सतिष दिवॆकर, दॆव्हारॆ गण अध्यक्ष मनोहर गुजर, शिरगाव गण अध्यक्ष अनंत शिगवण, सदस्य विनोद नगरकर, नगरसॆविका नॆत्रा शॆरॆ आणी कार्यकरतॆ उपस्थित होते.