(मुंबई)
देशात सतत वाढणाऱ्या महागाईमुळे नागरिक आधीच त्रस्त आहे. यात मुंबईकरांना आता आणखी एका महागाईचा भडका सहन करावा लाणगार आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता. मुंबईत सीएनजीचा दर चार रुपयांनी तर पीएनजी तीन रुपयांची महाग झाला आहे. यामुळे मुंबईत सीएनजीसाठी 80 रुपये प्रति किलो तर पीएनजीसाठी 48.50 रुपये मोजावे लागणार आहेत.
स्थानिक पातळीवरील गॅस सप्लायमध्ये तुटवडा निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे महानगर गॅस लिमिटेडने सांगितले आहे. सीएनजी, पीएनजीचे हे वाढते दर आज मध्यरात्रीपासून लागू केले जाणार आहेत.
महानगर गॅस लिमिटेडने यासंबंधी एक परिपत्रक जारी केले आहे. देशांतर्गत वाढत्या किमतीचे परिणाम एमजीएच्या उत्पादन किमतीवर होत असल्याने सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र या वाढत्या दराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. अनेक वाहन चालक पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सीएनजी वाहनांना प्राधान्य देत आहे. पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत सीएनजीचे दर सर्वात कमी आहेत. मुंबईत सीएनजीच्या दर 29 एप्रिलमध्ये वाढले होते. त्यावेळी सीएनजीचे दर चार रुपयांनी वाढले. त्यानंतर आज पुन्हा सीएनजीचे दर वाढले आहेत.