(मुंबई)
राज्याच्या महसूल विभागात आधुनिकता आणत असताना विभागातील अधिकाऱ्यांनाही पदोन्नतीने पदस्थापना दिली आहे. बुधवारी महसुल विभागामध्ये अव्वल कारकून व मंडळ अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या एकूण 306 कर्मचाऱ्यांना नायब तहसिलदार (राजपत्रीत, गट -ब) या संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली आहे, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
राज्याच्या कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपुर या महसुल विभागामध्ये अव्वल कारकून व मंडळ अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या एकूण 306 कर्मचाऱ्यांना नायब तहसिलदार (राजपत्रीत, गट -ब) या संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली आहे.
निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिध्दी नंतर उमेदवाराची ओळख प्रमाणपत्रे आणि संबंधित कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी याचप्रमाणे समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही अंतिम नियुक्तीपुर्वीची कार्यवाही, संबंधित जिल्हा निवड समितीकडून जिल्हास्तरावर करण्यात येईल, असं महसूल विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
अशी आहे संख्या
- छत्रपती संभाजीनगर विभागात (छत्रपती संभाजीनगर 8, जालना 5, परभणी16, हिंगोली4 , बीड 5, लातूर 5 , धाराशिव 8, नांदेड 8) एकूण 59.
- अमरावती विभागात (अमरावती 14, अकोला 10, बुलडाणा 14, वाशिम 7, यवतमाळ 6) एकूण 52
- नागपुर विभागात (नागपुर 12, भंडारा 4, गोंदिया 6, चंद्रपुर 18, गडचिरोली 13, वर्धा 4) एकूण 57
- नाशिक विभागात(नाशिक 9, अहमदनगर 10, जळगाव.9, धुळे 4, नंदुरबार 4) एकूण 36
- कोकण विभागात (मुंबई शहर 13, मुंबई उपनगर 22, ठाणे 17, पालघर 9, रायगड 19, रत्नागिरी 13, सिंधुदुर्ग 6, विभागीय आयुक्त कोकण यांचे कार्यालय 2, राज्य निवडणूक आयोग 1) एकूण 102