लसींच्या कमी पुरवठ्यामुळे राज्य सरकारने 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात 45 वर्षांवरील नागरिकांना प्राधान्य द्यावं लागेल. म्हणूनच 18 ते 44 वयोगटाला तुर्त लस मिळणार नाही, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केली आहे.
45 वरील व्यक्तींना दुसरा डोस भारत सरकार देवू शकत नाही. त्यामुळं दुसरा डोस देणं गरजेचं आहे. असं असल्यानं महाराष्ट्र सरकारने खरेदी केलेली लस ही 45 वर्षांवरील लोकांना दिली जाणार आहे. दुसऱ्या डोससाठी 20 लाख डोस हवेत. सध्या केवळ 10 लाख आहेत, अशी माहिती राजेश टोपेंनी दिलीये.
महाराष्ट्रात 18-44 वयोगटातील लसीकरण आपण स्थगित करत आहोत. सीरमचे प्रमुख आदर पुनावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यांनी 20 मे नंतर महाराष्ट्राला दर महिन्याला दीड कोटी डोसेस देऊ असं सांगितलंय. त्याची विगतवारी कशी करायची याबाबत ते लंडनहून भारतात आल्यावर निर्णय घेतील, असं राजेश टाेपेंनी सांगितलंय.