(चिपळूण / ओंकार रेळेकर)
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते ना. अजितदादा पवार यांची नुकतीच चिपळूणचे सुपुत्र, मर्चंड नेव्ही ऑफिसर इम्रान कोंडकरी यांनी भेट घेत शुभेच्छा दिल्या. चिपळूण शहरातील अनेक विकासकामासंदर्भात शासनाकडून आवश्यक सहकार्य मिळावे, पालिकेला आवश्यक निधी मिळावा या आशयाची मागणी करीता चिपळूण मधील सामाजिक कार्यकर्ते आ.शेखर निकम यांचे विश्वासू सहकारी मर्चड नेव्ही अधिकारी इम्रान कोंडकरी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेत केली. यावेळी आ.शेखर निकम यांनीही चिपळूणच्या स्थितीबाबत ना.पवार यांना आढावा दिला.
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी ही भेट घडवून आणली. चिपळूण तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज आणि आपण आमदार शेखर निकम यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात याबद्दल आपले कौतुक आहे, भविष्यात चिपळूण तालुक्यातील लागेल ते सहकार्य आपण करणार आहोत. तसेच मुस्लिम समाज बांधवांच्या काही समस्या असतील समाजाची विकासकामे असतील तर आपण माझ्याकडे घेऊन या, आपण त्या मार्गी लावू असे आश्वासन ना.अजितदादा पवार यांनी इम्रान कोंडकरी यांना यावेळी दिले. तसेच यावेळी चिपळूण तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा करताना विकासात्मक कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही खुद्द अजितदादांनी यावेळी दिली. या भेटीच्या वेळी जहीर कुंडलिक, इम्रान खतिब, बरकत पाते, खालिद खडस आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो : ना.अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन करतांना इम्रान कोंडकरी यांच्यासह आ.शेखर निकम, जहीर कुंडलिक, इम्रान खतिब, बरकत पाते, खालिद खडस आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत
(छाया : ओंकार रेळेकर)