(चिपळूण / ओंकार रेळेकर)
ओमळी येथील निलिमा चव्हाण या भगिनीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आज मराठा समाज चिपळूण तर्फे डी. वाय. एस. पी. राजेंद्रकुमार राजमाने यांना निवेदन दिले. तालुक्यातील ओमळी गावातील कु. नीलिमा चव्हाण ही दापोली येथे बँकेमध्ये नोकरी करत होती. काही दिवसांपूर्वी मी सुट्टीवर येते, असे शेवटचे वाक्य घरच्यांच्या कानावर आले आणि नीलिमा बेपत्ता झाली दरम्यान काही तास उलटून गेल्यानंतर दाभोळ खाडीत नीलिमा मृतावस्थेत मुंडन केलेले आढळून आली.
दरम्यान नीलिमाला तिच्या कुटुंबियांना योग्य न्याय मिळावा म्हणून चिपळूण मधील मराठा समाजाच्यावतीने चिपळूण डी. वाय. एस. पी. राजेंद्रकुमार राजमाने यांना निवेदन देऊन आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी असे देखील प्रास्तावित करण्यात आले आहे. यावेळी आमचा तपास युद्धपातळीवर सुरु आहे, असे चिपळूण डी. वाय. एस. पी. राजमाने यांनी सांगितले.
यावेळी प्रकाश देशमुख, सतीश मोरे, दिलीप देसाई, सतीश कदम, सुबोध सावंत देसाई, मकरंद जाधव, संतोष सावंत देसाई, राकेश शिंदे, राहुल शेलार, सुनील नलावडे, महादेव सावंत, शशिकांत साळवी, सिद्धांत देशमुख, संघर्ष शिंदे, मंगेश पाटील, अमित पवार, सचिन नलावडे, शैलेश मोरे, निर्मला जाधव, रमेश शिंदे, सुरज कदम, सचिन नलावडे, सिद्धांत देशमुख, प्रभाकर मोरे, मालतीताई पवार, निर्मलाताई जाधव, स्मिता खंदारे, अंजली कदम, सीमा चाळके, प्राजक्ता सरफरे, संघर्ष शिंदे, भाग्यश्री चोरगे, अक्षरा जाधव, पूर्वा तांदळे, सुकन्या चव्हाण, चंद्रकांत सुर्वे, किशोर कदम, आर्यन चव्हाण, प्रभाकर मोरे, मालती पवार आदी उपस्थित होते.