(देवरूख)
दत्तनगरतील जुन्याकाळातील शिक्षक व संगमेश्वर तालुका क्षत्रिय मराठा समाजाचे आधारस्तंभ व माजी सचिव यशवंत तथा दाजी सावंत (गुरूजी) यांचे देवरूखातील घरी वयाच्या ९२व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
दाजी म्हणूनच परिचित असलेल्या सावंत गुरूजींनी रत्नागिरी-देवरूख – संगमेश्वर आदी ठिकाणी सेवा बजावताना अध्यापनाबरोबरच पारंपारीक शेती. संस्कार. परंपरा याचे शिक्षण देत अनेक विद्यार्थ्यांना घडविले. ७० व ८० च्या दशकातील कडक शिस्तीचे गुरूजी म्हणून ते ओळखले जात.
कै अप्पा जाधव यांनी आपल्या निवडक सहकारेंना बरोबर घेत स्थापन केलेल्या संगमेश्वर तालुका क्षत्रिय समाजाचे ते सक्रीय सदस्य होते. देवरूखात मराठा भवनाची वास्तू व्हावी म्हणून त्यांनी आपल्या जुन्या समाज बांधवांबरोबरीने मोठे योगदान दिले.. अनेकवेळा भुमिपूजन होवून हि गेली अनेक वर्षे रखडलेल्या मराठा भवनाचे काम यावर्षीच खऱ्या अर्थाने पुर्णत्वास गेल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त करत योगदान देणाऱ्या समाज बांधवांचे मोठ्यांना मनाने कटूता न ठेवता सर्वांचे कौतूक केले व आपल्या मराठा बांधवांच्या उत्कर्षासाठी काम करत रहावे यासाठी प्रयत्न करावेत व मनभेद न ठेवता हा वसा जपवा असे आवाहन केले होते..
त्याचे पश्चात पत्नी व तीन मुलगे, सुना. नातवंडे असा परिवार आहे. त्याचेवर मुळगावी सडा मिऱ्या रत्नागिरी येथे अंत्यसंस्कार करणेत आले. अशा या निस्वार्थी व निगर्वी गुरूजनांना भावपूर्ण श्रद्धांजली!