[ रत्नागिर /प्रतिनिधी ]
तालुक्यातील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे सालाबादप्रमाणे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावर्षी गणेशोत्सवामुळे असल्याने सुट्टीचे दिवस होते. मात्र महाविद्यालय सुरू झाल्यानंतर शिक्षक दिनाचे नियोजन करून ८ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला.
दिवसभराच्या कामकाजानंतर शिक्षक रुपी विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे आणि शिकवणे यामध्ये असणारा फरक लक्षात आला. प्रत्येक गोष्टीमागे प्राध्यापकाची शिस्त, कष्ट सृजनशीलता, नाविन्याचा ध्यास, विद्यार्थ्यांची काळजी, प्रेम , कधी कठोरता अशा विविध गुणांची ओळख होण्यासाठी आजचा दिवस आमच्या आयुष्यातील अनुभवाचा खजिना आहे असे मत विद्यार्थीरूपी प्राचार्य झालेल्या आनंद नेवरेकर याने व्यक्त केले.
महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. स्नेहा पालये यांनी विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा स्वीकारत अशीच उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी आपल्या आयुष्यातील प्रत्येक शिक्षकरुपी माणसाचा आदर करा आणि यशस्वी व्हा असा मूलमंत्र देत सदिच्छा व्यक्त केल्या.
यावेळी महाविद्यालालाच्या प्राचार्य स्नेहा पालये, प्रा. अवनी नागले, प्रा. शामल करंडे, प्रा. तेजश्री रेवाळे, प्रा. दिपाली सावंत व विद्यार्थी उपस्थित होते.