(रत्नागिरी)
मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे लोकमनावर राज्य करणारा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम प्र प्राचार्य स्नेहा पालये व संचालक श्री माचिवले उपप्राचार्य कुलकर्णी आदी मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून मग त्यांनी केलेल्या कार्याचा परामर्श विद्यार्थ्यांनी आपल्या पोवाड्यातून सादर केला.
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर, राज्य करणारा राजाच म्हणजेच शिवछत्रपती. स्वराज्य स्थापना करण्याची स्वप्ने डोळ्यात बाळगून ती सत्यात आणून प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्याने जगायला त्यांनी शिकवले. त्यांनी आयुष्य दुसऱ्यांसाठी घालवले तसेच आपले जीवन सुद्धा सत्कर्मासाठी घालवावे व स्वतःमध्ये बदल घडवून ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करा. त्यांचा तुम्ही एक अंश आहात त्यांची कार्ये तुमच्या वर्तनातून दिसावी, असे महाविद्यालयाच्या प्र प्राचार्या स्नेहा पालये यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे उपप्राचार्य गणेश कुळकर्णी यांनी शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याला उजाला दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत गोताड याने केले. या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक सुरेंद्र माचीवले, महाविद्यालयाच्या प्र प्राचार्य स्नेहा पालये, उपप्राचार्य गणेश कुळकर्णी, प्रा.अवनी नागले, प्रा. तेजश्री रेवाळे व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.