(रत्नागिरी)
मुरारी मयेकर कला वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे दिनांक 16 डिसेंबर 2023 ते 19 डिसेंबर 2023 या कालावधीत महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार साळवी, सचिव रोहित मयेकर, संचालक सुरेंद्र माचीवले, महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या स्नेहा पालये, उपप्राचार्य गणेश कुळकर्णी, क्रीडा विभाग प्रमुख प्रा.जितेंद्र बोंबले, जाकादेवी हायस्कूलचे क्रीडा शिक्षक नलावडे उपस्थित होते.
वार्षिक क्रीडा स्पर्धा 2023 – 24 मध्ये सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, रस्सीखेच, लंगडी, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, भालाफेक, धावणे, थाळीफेक, कॅरम व बुद्धिबळ असे क्रीडा प्रकार घेण्यात आले. या क्रीडा स्पर्धेमध्ये मुलांच्या कबड्डी मध्ये प्रथम वर्ष कला, खो-खो मध्ये तृतीय वर्ष कला, हॉलीबॉल मध्ये, तृतीय वर्ष कला, तर रस्सीखेच मध्ये तृतीय वर्ष कला संघ विजयी ठरले आहेत. तर मुलींच्या कबड्डीमध्ये तृतीय वर्ष कला, खो – खो मध्ये प्रथम वर्ष कला, हॉलीबॉल मध्ये द्वितीय वर्ष वाणिज्य, रस्सीखेच मध्ये प्रथम वर्ष कला, लंगडी मध्ये तृतीय वर्ष कला संघ विजयी ठरले आहेत.
वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये उंच उडी मध्ये आदित्य लवंदे व वृषाली घाणेकर, लांब उडी मध्ये क्षितिज पवार व राजलक्ष्मी पवार, गोळा फेक मध्ये प्रितेश घवाळी व वृषाली घाणेकर, थालीफेक मध्ये तरंग फेपडे व संजना माने, भाला फेक मध्ये प्रीतम पाष्टे व तेजल खरात, कॅरम मध्ये सोनाली वाळवे व प्राची घाणेकर, बुद्धिबळ मध्ये मकरंद केळकर तसेच धावणे 100 व 200 मीटर मध्ये अनुक्रमे प्रतीक वझे, वृषाली घाणेकर, प्रतीक वझे, दिव्या सुर्वे विजयी झाले.
क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी पार पडला. या कार्यक्रमाला मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे सचिव रोहित मयेकर, खजिनदार ऋषीकेश मयेकर,संचालक सुरेंद्र माचिवले, महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या स्नेहा पालये, उपप्राचार्य गणेश कुळकर्णी, क्रीडा विभाग प्रमुख जितेंद्र बोंबले, बंटी सुर्वे तसेच महाविद्यालयाचा जी एस कुमार अमित घाणेकर आदी पाहुणे उपस्थित होते.
यावर्षी क्रीडा महोत्सवात कुमार आदित्य लवंदे ( तृतीय वर्ष कला ), वृषाली घाणेकर ( द्वितीय वर्ष कला )यांना अष्टपैलू खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. तर क्रीडा महोत्सव 2023 जनरल चॅम्पियनशिप चे मानकरी तृतीय वर्ष कला हा वर्ग ठरला.