(जाकादेवी/ वार्ताहर)
मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला सर्वप्रथम पुष्पहार अर्पण करून करण्यात आली
राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर योग्य संस्कार केले, त्यामुळे स्वराज्य स्थापना झाली. तसेच ‘घालुनी सांगड संस्कार आणि आधुनिकीकरणाची, देशाच्या विकासासाठी होईल तयार पिढी’ या उक्तीप्रमाणे स्वामी विवेकानंदांनी आपले सर्व जीवन देश बांधवांसाठी समर्पित केले. त्यांचा आदर्श घेऊन आपण समाजात योग्य बदल घडवून आणण्यासाठी तरूणांनी पुढे यावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ.स्नेहा पालये यांनी आपल्या भाषणातून केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक सुरेंद्र माचिवले, महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य स्नेहा पालये, प्रा. शामल करंडे, अमेश गावडे, किरण मुंडेकर, मिनाक्षी ठीक, विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.