(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील चाफे येथे असलेल्या मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालयात महाविद्यालयाचा NCC विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन विभाग रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. ५ ऑगस्ट २०२२ रोजी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर उत्तमरित्या संपन्न झाले. कोंकणात नैसर्गिक व मानवी आपत्तीचे प्रमाण वाढले आहे. शासकीय आपत्ती व्यवस्थापन टीम अश्यावेळी वेळेत घटनास्थळी पोहोचू शकत नाही, त्यावेळी शासनाचे प्रथम मदतगार म्हणून स्थानिक पातळीवर टीम उभी करणे असा उद्देश या प्रशिक्षणामागे आहे, असे प्रशिक्षक म्हणून आलेले एम. के.म्हात्रे Asst. Deputy controller Civil Defense यांनी सांगितले. या टीम मध्ये NCC च्या कॅडेट्स ना तसेच NSS च्या स्वयंसेवकांना प्राधान्य देऊन त्यांना ५ दिवसाचे प्रशिक्षण देऊन त्यांचा प्रमाणपत्रधारक व शासनाचे ओळख पत्र धारक असे आपत्ती व्यवस्थापक म्हणून समावेश केला जाणार आहे. यावेळी काही प्रात्यक्षिके ही श्री. म्हात्रे यांनी दाखविली.
कोणत्याही प्रकारच्या आपत्तीत स्वतःला इजा न करून घेता स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर करून आपत्तीत सापडलेल्या आपल्या व समाजातील इतर व्यक्तिंना वाचविण्याचे काम छोट्या छोट्या उदाहरणांद्वारे रत्नागिरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. अजय सूर्यवंशी यांनी समजावून सांगितले शासनाच्या अडचणी व संस्थांच्या अडचणी यांच्यामध्ये समनव्य घडवून आणणाऱ्या GO-NGO आपत्ती व्यवस्थापन सहायक श्रीमती. वैशाली म्हस्के उपस्थित होत्या.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनील मयेकर यांनी आपली स्वतःची एक आपत्ती व्यवस्थापन टीम असावी की जी आपल्या पंचक्रोशीत घडलेल्या अपत्तीवेळी तात्काळ मदतीला हजर असेल. अशी टीम तयार करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्याची परिपूर्ती आता होत आहे. या कामी कोणत्याही मदतीला मोहिनी मुरारी शिक्षण संस्था तयार असेल. तसेच ही टीम मालगुंड, चाफे, जकादेवी, काजूरली येथेही काम करेल असे मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे सचिव रोहित मयेकर यांनी सांगितले.
आपणच आपल्या माणसांना मदत करणार आहोत, त्यांचे प्राण वाचविणार आहोत यापेक्षा दुसरे पुण्याचे कार्य दुसरे नाही. याचा फायदा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व समाजातील तरुणांनी घ्यावा.याकामी महाविद्यालयातर्फे जी मदत लागेल ती महाविद्यालय करेलअसे महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या स्नेहा पालये यांनी सांगितले. हा कार्यक्रम जुळवून आणण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेक संघाचे मा. गजानन करमरकर, मा. समीर करमरकर, व मंदार जोशी व महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा. श्री. गणेश कुळकर्णी यांनी केले.