(जाकादेवी/ वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेच्या मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचा १४ वा वर्धापन दिन शिक्षण संस्थेचे धडाडीचे-उपक्रमशील चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध स्पर्धा-उपक्रमांनी अतिशय उत्साहात संपन्न झाला चाफे मयेकर महाविद्यालयाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला.
विस्तार विभागातर्फ रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तृतीय वर्ष वाणिज्य शाखेतील निशांत दिलीप धनावडे, पवन सुनील माचिवले, अक्षय शंकर घाणेकर, द्वितीय क्रमांक तृतीय वर्ष वाणिज्य शाखेतील प्राची उमेश निवळकर, कल्याणी राजेंद्र विचारे, अक्षता बळवंत साळवी, तृतीय क्रमांक तृतीय वर्ष कला शाखेत अभिजीत राजन गोताड, कपिल दिलीप जाधव, सागर सुरेश घाणेकर व उत्तेजनार्थ क्रमांक द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेतील चैताली नामदेव गावडे तनुश्री नंदकुमार घाटकर ज्योती पांडुरंग पावरी, यानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू बनवणे ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रवींद्र लवंदे द्वितीय क्रमांक अक्षय शंकर घाणेकर तृतीय क्रमांक पूर्वल चंद्रकांत तावडे, उत्तेजनार्थ दर्शना सुरेश जुवळे यांनी मिळवला .
पर्यावरण विभागातर्फे पुष्पगुच्छ रचना स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पल्लवी दीपक शितप, द्वितीय क्रमांक अथर्व अभय डिंगणकर, तृतीय क्रमांक निशांत दिलीप धनावडे, उत्तेजनार्थ अमोल संतोष रायकर. तर महिला विकास विभागातर्फे पाककला स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये प्रथम क्रमांक मृणाली दिलीप पालकर, द्वितीय क्रमांक प्राची उमेश निवळकर तृतीय क्रमांक गायत्री राजेंद्र जाधव यांनी मिळवला त्याचबरोबर महिला विकास कक्षाद्वारे हस्तकला आणि राखी विक्री प्रदर्शन या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्य संपादन केलेल्या तृतीय वर्ष कला शाखेत प्रथम क्रमांक निरंजन नंदकुमार नवेले 9.40 (A+), द्वितीय क्रमांक सोनाली सुरेश गोणबरे हिला 8.63(A), तृतीय क्रमांक अद्वेत किसन नेवरेकर 8.59 (A)त्याचबरोबर तृतीय वर्ष वाणिज्य शाखेमधून प्रथम क्रमांक रोशन नारायण बाचरे 9.35 (A+), द्वितीय क्रमांक अमित अनंत वीर 9.08 (A+), तृतीय क्रमांक सुरभी प्रकाश देसाई 9.03 (A+) व ज्योती सागर थापा 9.03 (A+) श्रेणी प्राप्त करून यशाचे मानकरी ठरले.
आपल्या मोहिनी मुरारी मयेकर शिक्षण संस्थेच्या यशाची उज्ज्वल परंपरा सदैव चालू असून छोट्या शैक्षणिक संकुलाचे रूपांतर वटवृक्षात झालेले पहायला मिळत आहे.यामागे विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य यांची मोठी मेहनत आहे. कै.डॉ.नानासाहेब मयेकर यांच्या धडपडीतून अणि दूरदृष्टीतून चाललेले शिक्षण संस्थेचे कार्य अनेकांच्या जीवनाला उभारी देणारे ठरत आहे. मयेकर कुटुंबीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सदैव कटिबध्द आहे.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पदवीनंतर स्वावलंबी बनविण्यासाठी कौशल्यावर आधारित उद्योग- व्यवसायाचे शिक्षण महाविद्यालयात सुरू करण्याची जाहीर घोषणा चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांनी या वर्धापन दिनानिमित्त केली. या घोषणेचे उपस्थित विद्यार्थी व पालकांनी स्वागत केले.
या वर्धापनदिनी संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार साळवी, मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे सक्रिय सचिव विनायक राऊत , संचालक किशोर पाटील, चाफे गावचे सरपंच सौ.गोवळकर,माजी सरपंच सुभाष रहाटे, मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे सचिव रोहित मयेकर, खजिनदार ऋुषिकेश मयेकर, श्रीमती शिरिषा मयेकर, संचालक श्री. सुरेंद्र माचिवले, श्रीकांत मेहेंदळे, महाविद्यालयाच्या प्राचार्या स्नेहा पालये, उपप्राचार्य श्री. गणेश कुळकर्णी, प्राध्यापक वर्ग, कर्मचारी, सुनिल मुरारी मयेकर ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक श्री महेश धनावडे, विद्यार्थी वर्ग व मोठ्या संख्येने पालक वर्गही उपस्थित होता.यावेळी अनेक मान्यवरांनी कै. डॉ.नानासाहेब मयेकर यांच्या कारकिर्दीचे स्मरण करून मोहिनी मुरारी मयेकर शिक्षण संस्थेच्या देदीप्यमान कामगिरीचे कौतुक केले. वर्धापन दिनाचा प्रारंभ कै.डॉ.नानासाहेब मयेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला.