(संगलट-खेड / इक्बाल जमादार)
मन, मेंदू, मनगट समर्थ करणेसाठी योगाभ्यास आवश्यक असल्याचे दापोलीतील ८२ वर्षाचे योग मार्गदर्शक दिनानाथ कोळेकर यांनी जिल्हा परिषद शाळा दमामे येथे अयोजीत योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात मत व्यक्त केले. वयाच्या दहाव्या वर्षापासून कोळेकर योगासने करतात.
आज ८२ व्या वर्षीदेखील न थकता पाच कि.मी. प्रवास करतात. चालणे हा सुध्दा सर्वांगसुंदर व्यायाम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुढे योग्य आहार, योग्य विचार, आणि नित्य व्यायाम केल्याने मन, मेंदू, मनगट सामर्थ्यशाली होतील, आणि शरीर निरोगी बनेल, असे सांगत, मानवी जीवन सप्तरंगी असून, सर्वांनी आपले शरीर या सप्तरंगात न्हाऊन, निरोगी आणि स्वस्थ ठेवावे असेही शेवटी सांगितले.
यावेळी गावचे उपसरपंच गंगाराम हरावडे व शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.