तेजा मुळ्ये, रत्नागिरी
अंतर्मनाचा अंतरंग तयार होतो थोडासा धूसर, थोडा अमूर्ताकडे जाणारा,, त्याचा ठाव घेताना साधारण रूपरेषा घटकांची आजमावत जातो. ती अंधारलेली बाजू थोडी कोनापासून पलीकडे दिसणाऱ्या अंधुक प्रकाशाच्या प्रतिरुपाची वाटते मन आणि अंतर्मन आपलंच त्यामुळे आकृती आणि प्रतिबिंब यापेक्षा ही संकल्पना वेगळी रहाते,, प्रतिबिंब आरशात बरोबर उलटे असते तर हा कोपरा संलग्न बाजूला मन आणि अंतर्मन यांना जोडतो,,अंतर्मनातील आकृत्या धूसर होत गेल्याने त्या गुढतेकडे जाऊ लागतात,,, वास्तव असणारा प्रकाश मनात स्थिरावतो आणि अंतर्मनात तो बंद न होता अंतरतो. मनाने वेध घेतलेल्या घटकांचे ठसे अंतर्मनाच्या अंरंगात दिसतात त्यामुळे अंतर्मनाचे संस्कार मनाला ओळखता येतात. या फोटोत मला हा कोपरा हीच मन आणि अंतर्मन अशी गम्मत दाखवतो.