( निवोशी-गुहागर / उदय दणदणे )
कलगी-तुरा लोककलेत प्रतिस्पर्धी शाहिरालाही गुरुसमान मानून शक्ती-तुरा सामना हा सामन्या प्रमाणेच रंगवून आपल्या दिलखेच अदाकारीने मनोरंजनाचे रंग उधळणारे युवा लोककलावंत अर्थात शाहीर: सुशीलकुमार धुमक होय ! कोकणची बहुप्रिय लोककला कलगी-तुरा अर्थात शक्ती- तुरा माध्यमातून अल्पवधीतच रंगमंचावर आपल्या दिलखेच मनोरंजनाने आणि स्मितहास्याने आपल्या कला अदाकारीने दिलखेच शब्द सुमनांनी रसिक प्रेक्षकांच्या हृदयीस्थानी आपले नाव ठासून उमठवणारे गुहागर तालुक्यातील निवोशी गावचे सुपुत्र कवी/शाहीर सुशीलकुमार धुमक यांचा आज वाढदिवस !
घरातूनच लोककलेचं बाळकडू मिळावं असं त्यांचं भाग्यच म्हणावं लागेल ! निवोशी गावचे लोककलावंत कै.यशवंत धुमक एक उत्तम भजनी बुवा तसेच नाटक / नमन कलाकार म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. त्यामुळे शाहीर सुशीलकुमार धुमक यांना बालवयातच लोककलेची आवड निर्माण झाली. पुढे आपले शालेय शिक्षण घेत तळवली येथे आपल्या आत्येकडे राहून आय टी आय डिप्लोमा जॉइन करून प्रशिक्षण घेत काम करू लागले. मात्र त्यांना गायन करण्याची आणि शक्ती-तुरा व नमन लोककलेची आवड असल्यामुळे त्यांचे मन स्वस्थ बसू देत नव्हते.
इच्छा तिथे मार्ग हा सापडतोच योगायोगच म्हणावं लागेल !
तळवली येथे त्यांना उत्तम मार्गदर्शक मिळावं असे सुकाई देवी प्रसादिक भजन मंडळ आगरवाडी नंबर -१ या मंडळाचे आदर्शवत व्यक्तीमत्व लोककलावंत तसेच भजनी बुवा श्री. श्रीधर आग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सुस्वर भजनातून सुशीलकुमार धुमक यांना गायनातील अनेक पैलूंची माहिती उपलब्ध झाली ! यासाठी त्यांचे आत्या आणि मामा श्री दिलीप आग्रे यांची मोलाची साथ मिळाली. २००४ मध्ये सुशिलकुमार धुमक मुबंईत येऊन आपले उर्वरीत पदवीधर शिक्षण पूर्ण करून “इंडेक्स हुंडाई” कंपनी जॉईन करून “बोडी शॉप डिपार्टमेंट” रुजू झाले.
पुढे आपल्या सहकारी मित्र मंडळ -निवोशी (भेलेवाडी) ग्रामस्थांचे व सहकाऱ्यांचे मार्गदर्शन घेत कोकणातील बहुप्रीय शक्ती -तुरा लोककलेला प्रेरित होऊन कोकण भूषण सन्मानित शंभूराजू घराण्यातील कविवर्य / शाहीर सुधाकर गावंणकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिष्य म्हणून नावलौकिक झाले. गेली दशकांपासून ग्रामीण /मुबंई रंगमंचावर कोकणची लोककला शक्ती- तुरा या लोककलेच्या माध्यमातून समाज प्रभोधात्मक कार्यक्रम करून, रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले हा एक युवा शाहीर प्रसिद्धीपासून नेहमी लांबच राहिला, हा त्यांचा स्वभाव अनेकांना भावतो !
आजवर त्यांनी नमन व शक्ती तुरा नाचाची साधारण ३५० पेक्षा अधिक स्वरचित गाणी लिहिली आहेत. यातील प्रसिद्धी गाणी नक्कीच नजीकच्या काळात रसिकांना ऐकायला मिळतील असे प्रयत्न त्यांचे सहकारी व मित्रपरिवार आणि सहकारी कलापथक निवोशी ( भेलेवाडी) करतील हे निश्चित ! प्रतिस्पर्धी शाहिरालाही गुरुसमान मानून शक्ती- तुरा सामना हा सामन्याप्रमाणेच रंगवून आपल्या दिखेच स्मित हास्य अदाकारीने मनोरंजनाचे रंग उधळणारे मनोरंजनाचा हुकमी एक्का कवी/शाहीर : सुशीलकुमार धुमक यांना आजच्या वाढदिवसा दिनी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !
रसिकांचे मनोरंजन व रंगदेवतेची सेवा अशीच सदैव आपल्या हातून घडत राहो हीच नटेश्वरचरणी प्रार्थना आई जाखमाता चरणी मनोकामना !