(मुंबई)
मनसे कार्यकर्ते आणि माथाडी कामगार यांच्यात मंगळवारी खारघरमधील मेडिकव्हर रुग्णालयाबाहेर मोठा राडा झाला. मनसेच्या पदाधिकाऱ्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर संघर्ष उफाळला निर्माण झाला आहे. नवी मुंबईत कामगार नेते महेश जाधव यांच्या समर्थक माथाडी कामगारांनी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. रुग्णालयाच्या परिसरातच माथाडी कामगारांनी मनसे कार्यर्त्यांना ही मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. मोठ्या संख्येने असलेल्या माथाडी कामगारांच्या मारहाणीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
दुसरीकडे माथाडी कामगार नेते महेश जाधव यांनी मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला. त्यावर आता मनसेकडून प्रतिक्रिया आली. महेश जाधव यांनी अमित ठाकरेंचा अपमान केल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी संदीप देशपांडे यांना मारहाण केल्याचं सांगितलं.
मनसेच्या पदाधिकाऱ्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षावर गंभीर आरोप केला. राज ठाकरेंचा पक्ष खंडणीखोर आहे, असा गंभीर आरोप महेश जाधव यांनी केला आहे. कामगारांची बाजू सोडत नाही म्हणून मनसे नेते अमित ठाकरे यांनीच आपल्याला राजगड येथे बोलवून बेदम मारहाण केल्याचा दावा त्यांनी केला आहे. महेश जाधव यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत अमित ठाकरे यांच्यावर मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
खारघरमधील मेडिकव्हर रुग्णालयाबाहेर मनसैनिकांना मारहाण केली. त्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले होत त्यांनी कामोठे येथील महेश जाधवांचं कार्यालय फोडलं.