(खेड)
श्री सिद्धीविनायक मंदिर, सोनार आळी येथे मनसे खेड तर्फे बुधवारी महाआरती व हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री. राजसाहेब ठाकरे आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना, खेड तर्फे वैशाख शु. तृतीया निमित्त काल बुधवार दिनांक ०४ मे २०२२ रोजी हिंदु धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला शुभमुहूर्त अक्षय्य तृतीया निमित्त सोनार आळी येथील श्री. सिद्धीविनायक मंदिर येथे महाआरती व हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते .
सदर वेळी तमाम बंधू- भगिनी व खेडवासियांनी महाआरतीसाठी व हनुमान चालीसा पठण कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते . सदर महाआरतीस व हनुमान चालीसा पठण कार्यक्रमास सहकार्य केलेल्या पोलिस बांधव- भगिनी व प्रशासकीय अधिकारी यांचे वैभव स. खेडेकर, मा. नगराध्यक्ष- खेड नगर परिषद तथा मनसे – सरचिटणीस (महाराष्ट्र राज्य ) यांनी आभार मानले आहेत