(मुंबई)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ६ मे रोजी कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. याबाबत रविवारी राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत दौऱ्यासंदर्भात चर्चा करण्यात आली, अशी माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.
मनसेच्या या घोषणेवरून राज ठाकरे पक्ष बांधणीच्या कामासाठी चांगलेच सक्रीय झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे या दौऱ्यामुळे मनसेला आगामी निवडणुकांमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. ‘महाराष्ट्रातील सत्ता माझ्या हातात द्या, मग तुम्ही बघाच महाराष्ट्र कसा करतो’, असे वक्तव्य राज ठाकरेंनी मागील कोकण दौऱ्याच्या सभेत केले होते. दरम्यान, मे महिन्याच्या सुरुवातीला होणाऱ्या राज ठाकरेंच्या या दौऱ्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.