(ठाणे/किशोर गावडे)
शुक्रवार १६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजून २० मिनिटांची मध्य रेल्वेची एसी लोकल ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून ठाण्याच्या दिशेने निघाली. ही लोकल रात्री साडे ११ वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकात पोहचली. परंतु, ठाणे रेल्वे स्थानकात या एसी लोकलचे दरवाजे न उघडल्याने एसी लोकलमधील जवळपास 45 ते 55 प्रवासी तसेच काही महिला प्रवाशी अडकले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
काल ठाणे रेल्वे स्थानकात एसी लोकलचे दरवाजे न उघडल्यानं 45 ते 55 प्रवाशांना फटका बसला आहे. ठाण्यात उतरणाऱ्या प्रवाशांना थेट कळवा कारशेड डेपोमध्ये जावं लागलं. प्रवाशांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे.
तर रेल्वे प्रशासनानं ठाणे स्थानकातील सीसीटीव्ही आणि एसी लोकलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहू अशी भूमिका घेतली होती. मात्र, या घटनेमुळे अफवांना एकच उधाण आले होते. रात्री साडे ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे कारशेड मधून आपल्या घरी परतण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र, एसी लोकलचे दरवाजे न उघडणे हे शक्य नसून या प्रकरणी तपास केला जाईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
शुक्रवार १६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजून २० मिनिटांची मध्य रेल्वेची एसी लोकल ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून ठाण्याच्या दिशेने निघाली. ही लोकल रात्री साडे ११ वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकात पोहचली. परंतु, ठाणे रेल्वे स्थानकात या एसी लोकलचे दरवाजे न उघडल्याने एसी लोकलमधील जवळपास 45 ते 55 प्रवासी तसेच काही महिला प्रवाशी अडकले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
लोकलचे दरवाजे न उघडल्याने अडकलेले प्रवाशी हे थेट कळवा विटावा येथील कारशेड मध्ये गेली. या दरम्यान एसी लोकल ट्रेन मधील कुठलेही पॅनल बटन किंवा हेल्प लाईन नंबर कामाला आला नसल्याचे देखील बोलले जात आहे.
रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास या एसी लोकलचे दरवाजे उघडल्यानंतर रात्रीच्या अंधारात नागरिक कारशेडमधून बाहेर चालत आले. रात्रीच्या सुमारास बाहेर आल्यानंतर कुठलीही वाहतुकीची सोय नसल्याने प्रवाश्यांना तारेवरची कसरत करत आपल्या घरी परतावे लागत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मध्य रेल्वेनं सुरु केलेल्या एसी लोकलबाबत ठाणे, कळवा, मुंब्रा, बदलापूर, अंबरानाथ, कल्याण डोंबिवली येथील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. दिवसातील महत्त्वाच्या वेळी एसी लोकलच्या फेऱ्या सुरु केल्यानं प्रवाशांनी आंदोलन देखील केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील याबाबत ठाम भूमिका घेतल्यानं मध्य रेल्वेला एसी लोकलच्या काही फेऱ्या रद्द करुन साध्या लोकल पुन्हा सुरु कराव्या लागल्या होत्या. मात्र, मध्य रेल्वेदेखील एसी लोकल सुरु राहावी यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.