(रत्नागिरी)
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच माळनाका स्वयंवर मंगल कार्यालय येथे संपन्न झाली. या बैठकीदरम्यान रत्नागिरीतील राजापूर, संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यातील अनेकांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामांवर विश्वास ठेवून हे सर्व पक्षप्रवेश होत असल्याच्या भावना रविंद्रजी चव्हाण यांनी व्यक्त केली.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पक्षप्रवेश केले गेले. यामध्ये संगमेश्वर दक्षिण मंडळातील अध्यक्ष रुपेश कदम यांच्या नेतृत्वात मुचरी ग्रामपंचायत सदस्य सौ. संपदा जोशी, पुष्कर शेट्ये, ओमकार मांजरेकर, वेदांत शेट्ये, श्रेयस गुरव, रुपेश केदारी, सिद्धेश परशुराम, राज मोहिते, आदि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश महेंद्र आंबेकर यांच्या पुढाकाराने व युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रथमेश धामस्कर यांच्या पुढाकाराने पार पडला. तर राजापूर मंडळातील श्री. प्रभाकर टोळे, श्री. राजनजी देसाई यांचाही पक्ष प्रवेश करण्यात आला. राजनजी देसाई हे 2014 चे ई.काँग्रेसचे विधानसभा उमेदवार होते. यांच्या पक्षप्रवेशांमुळे भारतीय जनता पार्टीला मोठा फायदा होणार आहे.
संगमेश्वर उत्तर मंडळातील अध्यक्ष विनोद म्हस्के व युवा मोर्चा संगमेश्वर उत्तर अध्यक्ष स्वप्निल सुर्वे यांच्या नेतृत्वात संजोग आंबेडकर (आंबेड), दस्तगीर शेख (कसबा), अर्षद काझी (कसबा), अय्यन वाडकर (कसबा), आर्यन जांबरकर (कसबा), झियान शेख (कसबा), कैफ शेख (कसबा), साहिल पन्हाळकर (कसबा), इमरान डांगे (कसबा), माझ पटेल (कसबा), कैफ उपाध्ये आंबेड, इबाद खान (आंबेड), इस्राल खान (कसबा), मंगेश चांदे (देवपार), मंदार रहाटे (आंबेड), सिद्धार्थ वाडकर (निधळेवाडी), फवाद अलजी (कसबा), अजय चौगुले (अंतरवली), विक्रांत लोद (नावडी), मंगेश जाधव (कुरधुंडा), ऋषिकेश चरकरी (धामणी), निलेश गुढेकर (नावडी), अनिकेत नागवेकर (आंबेड), अल्ताफ सय्यद (शास्त्रिपूल),
रत्नागिरी मंडळातील मिरजोळे माजी सरपंच संदीप उर्फ बावा नाचणकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यप्रणालीवर आणि स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुगीचे दिवस आल्याचे चित्र असून सर्व तालुक्यांमधून जोरदार इनकमिंग सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर रत्नागिरीतील कार्यकर्ते खुश असून त्यामुळेच जिल्ह्यात असे पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात होत असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे.