(रत्नागिरी)
फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दिनांक ०४ एप्रिल २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांनी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी विविध विषयावर संवाद साधला. या कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगीताने झाली. फिनोलेक्स ॲकॅडमीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत याचे स्वागत केले. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधतांना विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
विद्यार्थांच्या विविध प्रश्नांना उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत म्हणाले कि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने पार पडतील. ते पुढे म्हणाले की, कोविड -१९ च्या काळात गरज लक्षात घेऊन परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या. परंतु विद्यार्थ्यांना नोकरीच्या योग्य संधी उपलब्ध होण्यासाठी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी ऑफलाईन परीक्षा घेणेच विद्यार्थ्यांसाठी हितावह आहे. कंपनी ह्या ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा ऑफलाईन परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्यांना प्राधान्य देतील त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत ऑफलाईन परीक्षा घेणे हे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार केला तर योग्य ठरेल असे मत मांडले.
या कार्यक्रमाला रत्नागिरीचे नगराध्यक्ष श्री. प्रदीप साळवी, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद व रजिस्ट्रार श्री गजानन तारगावकर तसेच बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दर्शना बापट यांनी केले.