(वार्ताहर / पाली)
उदय सामंत उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी, रायगड जिल्हा यांच्या वाढदिवसानिमित्त शिव आरोग्य जनकल्याण प्रतिष्ठान हातखंबा यांच्या माध्यमातून हातखंबा गावातील सर्व शाळांमध्ये व माहेर संस्थेत जिलेबी वाटप तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा शाळांना भेट देण्यात आली.
या कार्यक्रमाकरीता प्रमुख अतिथी म्हणून बाळासाहेबांची शिवसेना हातखंबा- पाली गटाचे विभाग प्रमुख सचिन सावंत, उपविभाग प्रमुख अनिल पाडावे, महिला विभाग प्रमुख तसेच प्रतिष्ठानच्या अध्यक्षा विद्याताई बोंबले, हातखंबा गावचे सरपंच जितेंद्र तारवे, ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष अॅड. सुयोग कांबळे, प्रतिष्ठान कार्याध्यक्ष विलास बोंबले, ग्रामपंचायत सदस्या कस्तुरी सनगरे, रश्मिता बोंबले, पूर्वा तारवे, शिव आरोग्य जनकल्याण प्रतिष्ठान चे सचिव अजित बोंबले, डांगेवाडी गावकर शंकर डांगे, धर्माजी डांगे, कदमवाडी गावकर शांताराम कदम, संजय भुते, रविंद्र चव्हाण, पांडुरंग कांबळे, विकास सनगरे, अमित सनगरे, सागर सावंत, आर्यन कांबळे, चरवेली शाखा प्रमुख निशा पवार, मुख्याध्यपक, शिक्षक उपस्थित होते.