(मंडणगड)
दोन दिवस तालुक्यात संततधार पडणाऱ्या पावासाचा परिणाम तालुक्यात जनजीवनावर झाला आहे. १९ जुलै रोजी तालुक्यात ११० मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील मोठी असलेली भारजा नदीला पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. त्यामुळे काही गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला. मान्सूनच्या हंगामात एकूण १५८५ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे गतवर्षी म्हणजे १९ जुलै रोजी तालुक्यात १८६० मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली होती. गतवर्षीच्या तुलनेत तालुक्यात कमी पावूस झाला असला दोन दिवस सलग पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील खरीप हंगामातील भात लावणीची बहुतांश कामे मार्गी लागत असलेली दिसन आली आहेत.
मुसळधार पावसाने भारजा नदीला पूरसदृशस्थिती
तालुक्यातील सावित्री, निवळी, भारजा या मुख्य नद्यांसह गावागावातील सर्व लहान मोठे ओढे तुडुंब भरुन वाहत आहेत तिडे, तळघरे, कुंबळे यांना जोडणारी रस्त्यावरील मोठ्या कॉजवेवरून पाणी गेल्याने या गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क काही काळासाठी तुटला याशिवाय मंडणगड शहरापासून अडखळ, गोवले मार्गावरील मोऱ्यावरुनही पाणी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आपत्तीकरिता सर्व यंत्रणा अलर्टवर…
पावसातील आपत्तीकरिता प्रशासकीय यंत्रणा हाय अर्लटवर असून तालुक्यात दाखल झालेले एन. डी. आर. एफ चे पथक बाणकोट सागरी पोलीस स्थानकाचे हद्दीत सावित्री नदीच्या पाण्यामुळे धोक्याची शक्यता असलेल्या गावांच्या मदतीसाठी तैनात ठेवण्यात आले आहे. (19) रोजी पावसाचे रौद्र रूप लक्षात घेता तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. तालुक्यातील पंदेरी, चिचाळी, तुळशी, भोळवली. तिडे येथील धरणांमध्ये पाणी साठा वाढला आहे. दोन दिवस सलग पावूस असला तरी तालुक्यात कोठेही जीवीत वा वित्त हानीची माहीती आपत्ती कक्षाकडे प्राप्त झालेली नाही. तहसिलदार तानाजी शेजाळ यांनी सर्व यंत्रणांना अर्लट राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.