( मंडणगड )
तालुक्यातील मौजे केळवत येथील भारजा नदीच्या किनाऱ्यावर बसवलेले 5 इंजिन पंप चोरीस गेल्याची घटना 11 जून सायंकाळी 6 ते 12 जून सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय बिल्डर ऍण्ड कन्स्ट्रक्शन या कंपनीने पाण्यासाठी मौजे केळवत येथील भारजा नदीच्या किनाऱ्यावर 2 काँमेट कंपनीचे आणि 5 एच पी डिझेल इंजिन पंप बसवलेले होते. असे एकूण 7 पंप अज्ञाताने चोरुन नेल्याची तक्रार मंडणगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अज्ञातावर भादविकलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.