(मंडणगड)
मंडणगड तालक्यातील दाभट लाटवण येथील सामाजिक व शैक्षणिक संस्था कौमी इत्तीहाद एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी मुरादपुर दाभट व तन्झिला वेल्फेअर ट्रस्ट दाभट व मदरसा दारुल मसाकिन दाभट यांच्या संयुक्त विद्यमान दाभट येथे भारताच्या स्वंतत्र अमृत महोत्सव कार्यक्रम तसेच हर घर तिरंगा अभियान पार पडले. या अंतर्गत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शेक्षणिक व सामाजिक व्यक्ती तसेच संस्थेचे संस्थापक मन्सूर जुवले यांनी भूषविले. अर्सलान मिरकर यांनी कुराण पठण केले. अर्सलान बांदार यांनी नआत गायन केले. तर अर्फा जुवले, सुहान चिपळूणकर, सईद नगदादे, मन्सूर जुवळें यांनी देशभक्ती पर गीत सादर केले.
समी बांदार तसेच इतर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भाषणे केली. मौलाना मुजाहीद यांनी सर्वांचे पुषपगुच्छ देवून स्वागत व सूत्रसंचालन केले. या ठिकाणी कौमी इत्तीहाद संस्थेचे उप खजिनदार अखलाक सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच मुलांना बक्षीसे देवून कौतुक केले. या वेळी तनझीला वेल्फेअर ट्रस्टचे खजिनदार अर्फा जूवले, पेश इमाम अश्रफ धतुरे, करीम माखजणकर,साबीर उपाध्ये, सईद नगदादे, अलीम बामणे, पालक, ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित होते.
मन्सूर जुवले यांनी प्रास्ताविक सादर केली तसेच अध्यक्ष भाषणात भारताच्या स्वांतत्र्याचा अमृत महोत्सवाबद्दल शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाबद्दल मुलांचे कौतुक केले. शेवटी मिठाई वाटून उपस्थितांचे मौलाना मुजाहीद यांनी सर्वांचे आभार मानले.