(मंडणगड)
संविधान सन्मान समिती, चिपळूण यांच्यावतीने संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता संविधानाची महती सांगणारे शेकडो फलक, संविधानाची प्रतिकृती असलेली रॅली संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुळगाव असलेल्या आंबडवे येथून सकाळी ७ वा. निघणार आहे.
रॅली पुढे लोकनेते गोपीनाथ मुंडे महाविद्यालय, मंडणगड, कुंबळे – पालगड, आय एस महाविद्यालय खेड, तु. बा. कदम महाविद्यालय भरणे खेड , भरणे नाका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशी मार्गक्रमण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ संविधान सन्मान सभेत रूपांतरित होणार आहे यावेळी मुंबई विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. बाळासाहेब साळवे सभेला मार्गदर्शन करणार आहेत.
रॅलीत नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन संविधान सन्मान समिती सदस्य डॉ. गुलाबराव राजे, डॉ. अंशुमन मगर, प्रा. हनुमंत सुतार, प्रा. अरुण ढंग, प्रबोधन मंच मंडणगड यांनी केले आहे.