[ नवी मुंबई ]
कोरोनानंतरग जगभरात सध्या मंकीपॉक्स संसर्गाचे संकट घोंघावत आहे. मे महिन्यात मंकीपॉक्सचा उद्रेक झाल्यापासून समोर आलेल्या प्रकरणांपैकी ९८ टक्के प्रकरणांमध्ये समलिंगी, उभयलिंगी आणि पुरुषांसोबत संबंध ठेवणाऱ्या पुरुषांचा समावेश आहे. पुरुषांना मंकीपॉक्सची लागण होण्याचा धोका जास्त असल्याने एकापेक्षा अधिक जणांसोबत शरीरसंबंध नको, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. जागतिक आरोग्य संघटेनेचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयसस यांनी ही माहिती दिली आहे. मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण मे महिन्यात आढळला होता. त्यावेळी यानंतर ९८ टक्के समलैंगिक आणि महिलांशी संबंध ठेवणाऱ्या पुरुषांमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळली आहेत.