(किशोर पवार / कळझोंडी)
रत्नागिरी तालुका मॅंगो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची द्वितीय वार्षिक सर्वसाधारण सभा खंडाळा येथील पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये खंडाळा येथील नामवंत उद्योजक श्री. उमेश रहाटे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहाने संपन्न झाली.
या द्वितीय वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा कृषी अधिक्षक सौ. सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री. अजय शेंडे, नाबार्डचे डी.डी.एम. श्री मंगेश कुलकर्णी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी श्री. सागर साळुंखे, टेक्नोसर्व्ह चे श्री. पाटील, स्मार्ट प्रकल्प रत्नागिरीचे लेखापाल श्री. देव फोंडेकर, रत्नागिरी तालुका मँगो फार्मर कंपनीचे चेअरमन श्री. उमेश रहाटे व सी.बी.बी.ओ. संदीप कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेचे प्रस्ताविक डॉ. संदिप कांबळे यांनी केले. त्यानंतर रिळ गावचे सरपंच व आदर्श शेतकरी मिलिंद वैद्य व वाटद वडवली गावचे सुपुत्र आंबा व भाजीपाला आदर्श शेतकरी विलास किंजळे यांचा शाल व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर संदिप कांबळे, अजय शेंड्ये, गजानन पाटील, जयवंतदादा विचारे, सुनंदा कुराडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेश रहाटे यांनी आंबा, काजू,फणस उत्पादन सेंद्रिय खते, मार्केटिंग इ. बाबत उपस्थितांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले.