(खेड / इक्बाल जमादार )
मंगळवार 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास या भोस्ते घाटातील अवघड वळणावर एक अपघात झाला. हा अपघात कमी की काय पुन्हा तासाभराच्या फरकाने आणखी एक अपघात तिथेच झाला. असे दोन अपघात एकाच ठिकाणी काही वेळच्या फरकाने झाल्याने पुन्हा या घाटातील वळणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पहिला अपघात भोस्ते घाटातील अवघड वळणावर झाला. घाट उतरत असताना ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने ट्रक अवघड वळणावर संरक्षक कठडयावर आदळला. या अपघातात क्लिनर जखमी झाला. मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दुसरा अपघात हा पहिल्या अपघातापासून केवळ १०० मीटरवर असलेल्या स्पीड ब्रेकरमुळे घडला. घाट उतरणाऱ्या टँकरने स्पीड ब्रेकरवर स्पीड कमी केला त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर चालकाला नियंत्रित मिळवता न आल्याने कंटेनरने टँकरला मागून जोरात धडक दिली.
ज्या टँकरला मागून धडक बसली तो टँकर मात्र निघून गेला मात्र धडक जोरात बसल्यामुळे कंटेनरच्या चालकाची केबिन तुटून रस्त्यावर कलंडली. जेव्हा कंटेनरची टँकरला धडक बसली तेव्हा टँकरच्या बाजूने जाणाऱ्या मारुती कारला टँकर घासत गेला. त्यामुळे मारुती कारचेही नुकसान झालें. सुदैवाने कंटेनर रस्त्यावर कलंडला नाही. मारुती कार चालकाचे केवळ दैव बलवत्तर म्हणून तो या जीवघेण्या अपघातातून सहीसलामत वाचला.