(संगलट-खेड/इक्बाल जमादार)
खेड तालुक्यातील भोस्ते गावातील प्रख्यात बिल्डर श्री रिजवान सिकंदर जसनाईक यांची भोस्ते गावाचे महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते रामदासभाई कदम यांनी त्यांचा भव्य सत्कार केला. यावेळी त्यांच्याबरोबर दापोली मंडणगडचे आमदार योगेश कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी बांधकाम सभापती अण्णाजी कदम, माजी सभापती सिकंदरभाई जसनाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांनी शुभेच्छा देताना सांगितलेले, रिजवान जसनाईक हे युवा असून यांचे भविष्य पुढे मोठे आहे. पुढे अनेक महत्वाच्या पदांवर विराजमान होण्याची त्यांना संधी आहे. महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष या शासनाच्या महत्त्वाच्या पदाला आपण सर्वसामान्याना योग्य न्याय द्यावा अशीही इच्छा रामदासभाई कदम यांनी व्यक्त केली.