(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील भोके गावाच्या ४ कोटी ७७ लाखाच्या विकास कामांचे भूमिपूजन राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत तेथील स्थानिक ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले. गावाच्या विकासाच्या उन्नतीसाठी तुमचा पालकमंत्री म्हणून एक ही रुपया निधी कमी पडू देणार नसल्याचा शब्द येथील ग्रामस्थांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दिला.
सामाजिक स्तरावरील काम असून द्या किंवा आरोग्य क्षेत्रातील काम असु दे आम्ही तुमच्यासाठी सदैव सोबत आहोत. आम्ही विकास कामे करायची मात्र श्रेय्य घेणारी टोळी आमच्या मागून फिरते. आम्ही नारळ फोडला की ते श्रेय्य वादी लोक येऊन ती कामे आम्ही केलेली आहे असे सांगत फिरतात त्यांच्या पासून सावध रहा, असे आहावान पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. हा विकास महायुतीच्या माध्यमातून झाला आहे. तुम्ही गेली २५ वर्षे माझ्या सोबत आहात असेच कायम स्वरूपी आशीर्वाद द्या अशी विनंती केली. उरलेली विकासाची कामे मार्गी लावणार असल्याचा शब्द देत उपस्थिती लोकांचे आभार मानले. यावेळी येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री उदय सामंत यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी पालकमंत्री यांनी लहान मुलांना घेऊन केक कापून आपला वाढदिवस साजरा केला.
या कार्यक्रमाला तालुका प्रमुख बाबू म्हाप, सरपंच श्रीपत मायगडे, उपसरपंच संजय गावडे, मनस्वी जाधव, मंगेश जाधव, शाखा प्रमुख अनिल रेवाळे, सुरेश रेवाळे, सुरेश लिंगायत, दशरत गावडे, गावकर गणू मायगडे, कारभारी भिकाजी रेवाळे, संभाजी आंबेकर, रुपेश रेवाळे, दिशा मायगडे, स्वाती रेवाळे, शिवाजी आंबेकर, देवदत्त पेंडसे, भाजपाचे दीपक पवार यांच्या सह सर्व गावकर, कारभारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.