(दापोली)
आसूद जोशी आळी येथे टाटा मॅजिक व ट्रकमध्ये समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत आठ जणांचा मृत्यू झाला होता. यात गंभीर जखमी झालेली अठरा वर्षीय भूमी हरिष सावंत ही गेली नऊ दिवस मुंबई येथे हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होती. अखेर काल, रविवारी रात्री तीचा मृत्यू झाला.
भूमीच्या मृत्यूने या अपघातातील मृतांची संख्या नऊ झाली. दि. २५ जून रोजी हा अपघातात झाला होता. दापोली ते हर्णे प्रवासादरम्यान अपघातात भूमीसह तिची बहिण गंभीर जखमी झाली होती. भूमी गेली नऊ दिवस मृत्यूची झुंज देत होती. अखेर तिचा मृत्यू झाला. तर तिची लहान बहिण मुग्धा मृत्यूशी झुंज देत आहे. भूमीच्या मृत्यूने दापोली तालुक्यावर शोककळा पसरली. भूमीने इंदूर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लाठीकाठी स्पर्धेत राष्ट्रीय सुवर्ण पदक पटकावले होते, ती मर्दानी खेळात पारंगत होती. छत्रपती शिवरायांच्या काळातील अनेक कला तिला अवगत होती. मर्दानी खेळात मुलींचा सहभाग वाढण्यासाठी भूमीचे प्रयत्न सुरू होते. भूमी सावंत व तिची बहीण मुग्धा सावंत दोघेही राष्ट्रीय स्तरावर लाठीकाठी स्पर्धेत मैदान गाजवले.
दरम्यान भीषण अपघाताप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे.