(चिपळूण/ प्रतिनिधी)
ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याला दहा दिवस झाले, तरी त्यातील आरोपी पोलिसांना भेटू शकत नाहीत. पोलिसांना जर या गुन्ह्याचा तपास करणे अवघड आणि जिकरीचे झाले असेल, तर याचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावा, अशी मागणी मनसेचे जिल्हा सचिव संतोष नलावडे यांनी गुरुवार दि. २७ ऑक्टोबर रोजी केली आहे.
शिवसेने नेते भास्कर जाधव यांच्या घराठिकाणी असणारा बंदोबस्त हटविला होता. याचवेळी आ जाधव यांच्या घराजवळ पेट्रोलची बाटली, दगड आणि स्टम्प पडले होते. दि. १८ ऑक्टोबर रोजी रात्री हा प्रकार घडल्यानंतर सकाळी चिपळूण पोलीस स्थानकात शेकडो शिवसैनिकांनी धाव घेऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. मात्र दहा दिवस झाले तरी आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही, या संदर्भात मनसेचे जिल्हासचिव संतोष नलावडे यांनी या गंभीर प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी करावा, अशी मागणी केली आहे
दरम्यान, घरावरील हल्ला प्रकरणात माजी आमदार रमेश कदम यांच्या पाठोपाठ आता मनसेचे जिल्हा सचिव संतोष नलावडे यांनी मागणी केली आहे.