(मुंबई)
गुरूवारपर्यंत राज्यात विजेची अघोषित आणीबाणी होती, मात्र गुरूवारी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याबाबत कबुली दिली आहे. सरकार या सगळ्या गोष्टी जाणूनबुजून करत आहे असे माझे ठाम मत आहे. आधी विजेची टंचाई निर्माण करायची आणि मग चढ्या दराने वीज घेत कंपनीकडून टक्केवाचा मलिदा घ्यायचा असा प्रकार सरकारकडून सुरू असल्याची टीका भाजपा आमदार आशीष शेलार यांनी केली आहे.
देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वीज निर्मिती केंद्र बंद करण्यात आली असून वीजसाठी कोळसा उपलब्द नाही असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. वीज पुरवठा करणाऱ्या तिन्ही कंपन्यांचे व्यवस्थित चालू असलेले काम बेशिस्त करण्याचं नियोजन हे या सरकारने केलं आहे. जाणून बुजून सरकारकडून भारनियन निर्माण केलं जातं आहे व ते आपल्यावर स्वतःच्या फायद्यासाठी जनतेवर लादले जात आहे. याच विरोधात भाजपा आजपासून राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील आशिष शेलार यांनी दिला आहे. यावेळी राज्यभर भाजप कार्यकर्ते वीज मंडळाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.
सगळे पक्ष भोंग्यावरून राजकारण करत आहेत, मात्र भाजपा जनतेच्या प्रश्नावर म्हणजेच भारनियमनावर लक्ष ठेवून आहे असं सांगतानाच अजान, भोंगे, हनुमान चालीसा या सगळ्यांना वीज ही लागणारच असल्याचं आशिष शेलार यांनी याबाबत टीका केली आहे. मात्र अनधिकृत भोंग्यावर कारवाई ही झालीच पाहिजे असे आपले मत असून, जर सरकारने अनधिकृत भोंग्याना अधिकृत करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जशास तशे उत्तर देऊ असा इशारा देखील भाजपातर्फे त्यांनी सरकारला दिला आहे. त्याचबरोबर जर हनुमान चालीसा कार्यक्रम विविध ठिकाणी झाले तर त्याच आम्ही स्वागतच करू अस स्पष्ट मत आशिष शेलार यांनी व्यक्त केलं आहे.