(टोकियो)
भारत, रशियानंतर आता जपान चंद्रावर ‘स्लिम’ लँडर पाठवणार आहे. जपानने ‘स्लिम’ लँडर ही चांद्रमोहीम जाहीरही केली आहे. २८ ऑगस्टलाच याचे प्रक्षेपण होणार होते; पण ते पुढे ढकलण्यात आले. ‘जाक्सा’ या जपानच्या अंतराळ संशोधन संस्थेतर्फे लवकरच प्रक्षेपणाची नवी तारीख ठरणार असून, त्याची घोषणा करण्यात येणार आहे.
जपानचे चंद्रावर ‘स्लिम’ लँडर प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. याच्या तारखेची घोषणा झाल्यानंतर त्याचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. जपानचे स्लिम लँडर म्हणजे ‘स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून’. या लँडरचे वजन २०० किलो आहे. लांबी २.४ मीटर आणि रुंदी २.७ मीटर आहे. यामध्ये सर्वोत्तम रडार, लेसर रेंज फाईंडर आणि व्हिजन आधारित नेव्हिगेशन सिस्टीम आहे. तळहातावर ठेवता येईल, असा एक रोबोही त्यासोबत आहे. भारताच्या चांद्रयान-३ च्या यशानंतर आता जगाचे लक्ष जपानच्या ‘स्लिम’ लँडरकडे आहे. हे ‘स्लिम’ लँडर लवकरच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. मोहीम यशस्वी झाल्यास दक्षिण ध्रुवावर उतरणारा जपान हा जगातील दुसरा देश ठरेल.
यामध्ये सर्वोत्तम रडार, लेसर रेंज फाईंडर आणि व्हिजन आधारित नेव्हिगेशन सिस्टीम आहे. तळहातावर ठेवता येईल, असा एक रोबोही सोबत आहे.