(रत्नागिरी)
भारतीय स्टेट बँक, क्षेत्रीय व्यवसाय कार्यालय रत्नागिरी यांचेतर्फे सोमवार दिनांक २ मे २०२२ रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्राहक मेळावा रत्नागिरी येथील हॉटेल सी फॅन्स येथे आयोजीत करण्यात आला होता. उपस्थित ग्राहकांचे स्वागत क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. प्रशांत जोशी यांनी केले.
कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्टेट बँक स्थानिक प्रधान कार्यालय, मुंबई येथून उप महाव्यवस्थापक श्री . मोहींदर बसेन उपस्थित होते. कार्यक्रमास भारतीय स्टेट बँकेच्या रत्नागिरी, मारुती मंदिर, साळवी स्टॉप या शाखांचे ग्राहक वर्ग उपस्थित होता. तसेच रत्नागिरी व मारुती मंदिर शाखेचे व्यवस्थापक तसेच रत्नागिरीमधील कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमामध्ये बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्या संदेशांची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. कार्यक्रमामध्ये डिजिटल व्यवहारांच्या सुरक्षेविषयी ध्वनीचित्रफीतीद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. यानंतरच्या खुल्या सत्रात सन्माननीय ग्राहकांनी बँकेविषयी आपली मते व्यक्त केली.