(करिअर)
बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छूक असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. भारतीय स्टेट बँकेने असिस्टंट मॅनेजर पदासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत असिस्टंट मॅनेजरसह मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, सिनिअर पोजेक्ट मॅनेजर पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी इच्छूक असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबत माहिती पुढीलप्रमाणे
भारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ज्यात असिस्टंट मॅनेजर- ३३५ जागा, मॅनेजर पद- ८ जागा, डेप्युटी मॅनेजर पदासाठी एकूण ०८ जागा आणि सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर पदाच्या एकूण ०७ जागेचा समावेश आहे. भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत संकेतस्थळ sbi.co.in वर जाऊन इच्छूक उमेदवार अर्ज करून शकतात.
या पदांसाठी B.E/B.Tech/M.Tech/MSc उतीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. इतर क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचे अर्ज नाकारण्यात येतील. या नोकरीसाठी उमेदवाराचे वय ३२ ते ४५ असणे आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ आक्टोबर २०२३ आहे. त्यानंतर उमेदवारांकडून आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
अर्ज शुल्क
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएसच्या उमेदवारांकडून ७५० रुपये अर्ज शुल्क आकारले जात आहे. तर, एससी/एसटी/ईएमएस उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली.
– उमेदवारांनी सर्वप्रथम एसबीआयच्या अधिकृत संकेत स्थळ sbi.co.in. वर भेट द्यावी.
– बँकेच्या होमपेजवर गेल्यानंतर ‘SBI SCO Recruitment 2023 Apply Online Link’ असलेल्या लिंकवर क्लिक करा.
– येथे स्वतःची नोंदणी करून योग्य कागदपत्रे अपलोड करा.
– अर्ज भरल्यानंतर पुन्हा एकदा वाचा आणि त्यानंतरच सबमिट बटणावर क्लिक करा.
– अर्ज सबमिट केल्यानंतर फॉर्म डाऊनलोड करावे.