(रत्नागिरी)
कोकण रेल्वे व्यवस्थापन विरोधात रेल कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शन खाली रेल कामगार सेना कार्याध्यक्ष संजय जोशी तसेच सरचिटणीस दिवाकर देव याच्या नेतृत्वाखाली तसेच krceu चे अध्यक्ष शुभाश मळगी याच्या बरोबर रेल कामगार सेना, कोकण रेल्वे एम्प्लॉइज युनियन तसेच कोकण रेल्वे एससी एसटी असो. आणि ओबीसी असो. एकत्ररित्या हल्लाबोल मोर्चा चे आयोजन केले होते. कोकण रेल्वे कामगारांना भारतीय रेल्वे प्रमाणे बोनस मिळायला हवा ही मुख्य मागणी करीत आजच्या मोर्चाचे आयोजन केले होते.
कोकण रेल्वे फायद्यात असून कामगारांना पूर्ण बोनस देवू शकते, ह्या विषयी शुभाष मलगी तसेच संजय जोशी यांनी कामगारांना समजावून सांगितले. रेल्वे मंत्रालय साधारणपणे प्रवासी तिकिटावर ५३ टक्के सबसिडी देते, असे रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. त्याप्रमाणे कोकण रेल्वे ही कॉर्पोरेशन असल्याने ५३ टक्के रक्कम केंद्र सरकार कोकण रेल्वेला देणे बंधनकारक असल्याने आणि ती रक्कम करोडोमध्ये असल्याने कामगारांसाठी खूप काही करता येवू शकते असे माळगी म्हणाले.
कोकण रेल्वे मधील मंगलोर पासून ते रोहा पर्यंत असंख्य कामगार यावेळी उपस्थित होते. मोर्चा संबोधित झाल्यावर डायरेक्टर फायनान्स यांना निवेदन देण्यात आले. आपण पूर्ण बोनस न दिल्यास नाताळ वेळी कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक बाधीत होऊ शकते असा इशाराही दिला आहे. तसेच कोकण सीएमडी श्री संजय गुप्ता यांना कोकण रेल्वेमध्ये फिरताना काळे झेंडे ही दाखविले जाणार असल्याचे सांगितले.
मोर्चा मध्ये एससी एसटी असो.चे नारायण दास तसेच ओबीसी असो.चे रामनाथ पाटील यांनी मार्गदर्शन केले. मोर्चा यशस्वी करण्यासाठी राजू सुरती, मिनाज झारी, राहुल पवार, किशोर सावंत, दळवी, रवी गुजर, दत्त तेलंगे, गजा गायकर, मुरुगेशान, प्रमोद तसेच राजा कुट्टी, चंद्रकांत विनरकर, मनोज निकम, भुसारे, योगेश भोईर, विजय आव्हाड कोकण रेल्वे विभाग राजू सुरती जनरल सेक्रेटरी, आणि मिनाज अयुब झारी जॉईन जनरल सेक्रेट्ररी, समिुद्दीन दादारकर, संतोष पास्ते, संजय यादव, नागराज देवडीगा हजर होते.