दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडीया तथा भारतीय बौध्द महासभा रत्नागिरी जिल्हा शाखेच्यावतीने आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीत ‘वर्षावास’ प्रवचन मालिकेचे जिल्ह्याभरात विविध कार्यक्रम जिल्हाअध्यक्ष अनंत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात आले. या वर्षावास मालिकेचा सांगता समारंभ भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अनंत सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंडणगड तालुक्यातील लोकनेते स्व. गोपिनाथ मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे (रविवार दि. ०९ ऑक्टोबर २०२२ रोजी) उत्साहात संपन्न झाला.
आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा हा ‘वर्षावास’ कालावधी बौध्द धम्मात अत्यंत पवित्र असा कालावधी मानला जातो. वर्षावासला बौध्द परंपरा आहे. भगवान बुध्दांनी बुध्द झाल्यानंतर वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत एकूण ४५ वर्षावास केले आणि या वर्षावासात मानवाच्या हिताची, सुखाची, कल्याणाची व दुखः मुक्तिची शिकवण सर्व सामान्य मानसापर्यंत स्वतः आणि भिक्षु संघामार्फत पोहचविली. ही ‘वर्षांवास’ची बौध्द परंपरा भारतीय बौध्द महासभेने आदरणीय महाउपासिक मिराताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारत देशात आजही जतन केली आहे. रत्नागिरी जिल्हात देखिल जिल्हाध्यक्ष अनंत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहे. गेले दोन वर्ष कोरोनाच्या कालावधीत हे कार्यक्रम होऊ शकलेले नाही. मात्र, यंदा शासनाने कोरोना निर्बंध शिथिल केल्याने आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीत जिल्ह्यात विविध गाव शाखांमधून वर्षावास कार्यक्रम घेण्यात आले. दरम्यान या वर्षावास मालिकेच्या सांगता समारंभ कार्यक्रमाला प्रवचनकार एन. बी. कदम (सरचिटणीस रत्नागिरी जिल्हा) यांनी भगवान बुध्दांचे ४५ वर्षांवास व वर्षावास समाप्ती या विषयावर मौलिक विचार मांडून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला जिल्हा कोषाध्यक्ष विजय दौ. कांबळे, कार्यालयीन सचिव प्रदिप जाधव, जनार्दन मोहिते, अ. जा. मोहिते, महिला विभाग उपाध्यक्षा आशाताई कांबळे, महिला सचिव पुजाताई जाधव, जिल्हा संघटक मंगेश पवार , विजय जाधव, हिशेब तपासणीस अनंत जाधव, प्रकाश सुर्वे, महेंद्र कदम, शरणपाल कदम, अल्पेश सकपाळ, जयरत्न कदम, तानाजी कांबळे, प्रकाश सुर्वेसह जिल्ह्याभरातून अनेक बौद्ध बांधव उपस्थित होते.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !