(जाकादेवी/वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील भारतीय बौध्द महासभा ग्रामशाखा ओरी बौध्दवाडी येथील ‘जेतवन बुदविहार’ येथे वर्षावास कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. सदरचा कार्यक्रम बौध्दाचार्य आयु. विजय लक्ष्मण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सचिव आयु. एन बीं कदम गुरुजी यांनी त्यागमूर्ती माता ‘रमाआई ‘या विषयावर धम्मं प्रवचन दिले. यावेळी बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष आयु. विजय मोहिते (गुरुजी ) यांनी कायेक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
तालुका संस्कार समितीचे सचिव दिपक जाधव, उपाध्यक्ष -अशोक यादव (गुरुजी )बौद्धसमाज परिवर्तन समिती जाकादेवी, पंचक्रोशी कोषाध्यक्ष विश्वास जाधव, श्रामणेर, बौध्दाचार्य, आदेश कांबळे, देवदत्त कांबळे,. महिला अध्यक्ष सौ. शर्मिला जाधव, गणपत जाधव, विष्णू जाधव, प्रमोद जाधव, सुभाष, जाधव संतोष कदम, प्रथमेश जाधव, नंदकुमार जाधव. तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष. वसंत जाधव, बिपीन जाधव, चंद्रहास फॉउंडेशनचे अध्यक्ष विनोद जाधव यांसह बौद्ध बंधू भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. प्रतिक कदम यांनी केले. तर आभारप्रदर्शन तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष आयु. सिद्दार्थ जाधव यांनी केले.