(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील भारतीय बौध्द महासभा गाव शाखा विल्ये येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने वर्षावास कार्यक्रम शाखेचे अध्यक्ष सुवेज कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी प्रमुख व्याख्याते केंद्रीय शिक्षक महेंद्र जाधव गुरुजी यांनी अतिशय अभ्यासपूर्ण धम्म प्रवचन दिले. प्रारंभी धम्मध्वजाचे ध्वजारोहण आयु. गंगाराम झिप्रू कांबळे यांच्या हस्ते तर पक्षीय ध्वजाचे ध्वजारोहण महिला मंडळ सदस्या शोभा भिकाजी कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी धार्मिक पुजापाठ माजी श्रामणेर बौध्दचार्य आदेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्री बाई फुले महिला मंडळाच्य सदस्या अंकिता नवनित कांबळे आणि मेघा सुवेज कांबळे यांनी सूत्रपठण केले. आयोजित सभेत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रमुख व्याखते आयु. महेंद्र जाधव गुरुजी यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. बुध्द धम्माचे महत्त्व विशेद केले. या कार्यक्रमाला गाव शाखेचे पदाधिकारी, महिला मंडळ, तरूण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ओघवत्या शैलीत शाखेचे सचिव व युवा कार्यकर्ते देवदत्त प्रकाश कांबळे यांनी केले.
यावेळी ग्रामपंचायत विल्येचे उपसरपंच नरेश कांबळे, सदस्या अपर्णा कांबळे, सुकेशिनी कांबळे, पोलीस पाटील रमेश कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुरेखा भालचंद्र कांबळे यांसह बौद्ध बंधू भगिनी आवर्जून उपस्थित होते.