(दापोली)
रत्नागिरी जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दापोली तालुक्यातील माता रमाई स्मारक वणंद येथे 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत दहा दिवशीय निवासी बौद्धाचार्य श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला भिक्षु संघाचे अध्यक्ष तथा चैत्यभूमीचे व्यवस्थापक पूज्य भंते बी संघपाल महाथेरो यांच्या हस्ते प्रवज्या विधी व श्रामणेर शिबीर होणार आहे.
भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी जिल्हा शाखेअंतर्गत सर्व तालुक्यांच्या माध्यमातून सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या श्रामणेर शिबिरात 27 शिबिरार्थिनी सहभाग नोंदविला आहे. हे शिबिर दापोली तालुक्यात होणार आहे. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या रत्नागिरी जिल्हाचे प्रमुख पदाधिकारी कार्यरत राहणार आहेत.
या शिबिरासाठी समाजातील बांधवांनी श्रामणेर संघाला चिवरदान, वस्त्रदान, वस्तुदान, फलाहार, नाष्टा, भोजन व आर्थिक दान करून सहकार्य करावे. जिल्हा सरचिटणीस एन बी कदम यांच्या 7066679084 या क्रमांकावर संपर्क साधून दान करावे. असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने करण्यात आले आहे.