(करिअर)
दहावी पास उमेदवारांसाठी भारतीय डाक विभागात एकूण 40889 पदांसाठीची भरती घोषित करण्यात आली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यामुळे पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2023 आहे.
महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागा
या पदांसाठी होणार भरती
1) GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2) GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3) GDS-डाक सेवक
शैक्षणिक पात्रता
– मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळातून इयत्ता 10वी उत्तीर्ण. तसेच मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
वय श्रेणी :
किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे.
परीक्षा फी :
General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
– BPM साठी रु. 12,000 ते -29,380.
– GDS/ABPM साठी रु. 10,000 ते -24,470.
दिनांक 16 फेब्रुवारी 2023 ऑनलाईन अर्ज शेवट
उमेदवारांच्या ऑनलाइन सबमिट केलेल्या अर्जांच्या आधारे, एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि त्यांची निवड केली जाईल.
उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे प्राधान्य मिळणार नाही. अंतिम निवड 10वी मध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित असेल.