( पाचल / वार्ताहर )
भारतीय जनता पार्टी पाचल विभाग आयोजित राजेश उर्फ बाळू साळवी यांनी यावर्षी देखील भव्य दिव्य बैलगाडी स्पर्धेचे आयोजन केले आहे. रविवारी 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणारी स्पर्धा विना फटका असून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या बैलगाडीच्या जनावरांना लंपी डोस दिलेल्याना या स्पर्धेत सहभागी घेता येईल अशी अट घालण्यात आली आहे. ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे ते राजेश उर्फ बाळू साळवी हे पाचल पंचक्रोशीत भारतीय जनता पार्टीचे राजापूर तालुका माजी उपाध्यक्ष म्हणून तर विद्यमान सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. बैलगाडी शर्यत महाराष्ट्रात कुठेही असली तरी त्या बघायला जाणं, त्याचा आनंद लुटणं हा त्यांचा छंद, परिसरात सामाजिक कार्य करत असताना काही वर्षांपासून त्यांनी स्वतःहून बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करून संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर अख्या महाराष्ट्रातील बैलगाडी स्पर्धेचा छंद जोपासणाऱ्यांना एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे.
महाराष्ट्रातील कानकोपऱ्यातून या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने यावेळी त्यांनी बक्षीसांची रक्कम वाढवून ती पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणात विस्तारित केली आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 23023/- व ढाल असून द्वितीय 18023/- व ढाल आहे. तर तृतीय क्रमांकाला 13023/-व ढाल असून चौथ्याला 8023/- ढाल पाचव्याला 7023/-व ढाल अशी आकर्षक बक्षिसे ठेऊन या स्पर्धेचे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे स्थानिक बैलगाडी स्पर्धेकांना प्रोत्साहन मिळावं या हेतूने त्यांनी पाचल – तळवडे येथील स्पर्धकांना त्यांनी प्रथम क्रमांकाला 3023/- व ढाल तर द्वितीय क्रमांकाला 2023/- व ढाल अशी बक्षिसे जाहीर केली आहे. सदर स्पर्धा ह्या राजापूर तालुक्यातील पाचल – ताम्हाणे रोडवरील कुंभारवाडी कोकरेवाडी, तळवडे येथे भरविण्यात आल्या असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी श्री बंड्या बामणे (9420339125), श्री जयंत धावडे (7276646836), श्री सिद्धेश नारकर (7276195828) श्री सुनील गुरव (9423411530) व श्री शुभम परब (9356774898) या नंबर वर संपर्क साधण्याचे आव्हान करण्यात आले आहे या स्पर्धेसाठी प्रवेश फी म्हणून 500/- रुपये म्हणून आकारण्यात आली असून स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात असल्याने ही स्पर्धा सकाळी 11 वाजल्यापासून चालू करण्यात येणारं असल्याचे आयोजक श्री राजेश उर्फ बाळू साळवी यांनी सांगितलं आहे.