भारतात लवकरच 5G सेवा सुरु होणार आहे. भारतात सध्या 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया सुरु आहे. शनिवारी या प्रक्रियेचा पाचवा दिवस होता. केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे की, 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया संपवत ऑक्टोबरमध्ये भारतात 5G सेवा सुरु करण्याचा प्रयत्न असेल. भारतातील 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. यामुळे भारतात लवकरच ऐतिहासिक घटना घडणार आहे.
केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, भारतातील टेलिकॉम क्षेत्रात आगामी काळात मोठे बदल घडणार आहेत. केंद्र सरकारकडून यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारतीय टेलिकॉम क्षेत्राला जागतिक पातळीवर जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. भारतील टेलिकॉम क्षेत्राचा ग्लोबल बेंचमार्कसोबत ताळमेळ बसवण्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे.