पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात पेंटटमधील भारताच्या ऐतिहासिक कामगिरीचा उल्लेख केला. पेटेंटच्या माध्यमातून जगाला देशाच्या स्वदेशी तंत्रज्ञानाची ओळख होत आहे. आजवर अनेक प्रकरणात भारताला पेटंट मिळवण्यात बरीच मेहनत घ्यावी लागली. काहीवेळा कायदेशीर लढाई देखील करावी लागली. परंतु आता या मुद्यावर भारतीय संशोधक, नागरिक अधिक सजग दिसून येताहेत.
गेल्या पाच वर्षात भारताच्या पेटेंट नोंदणीत ५० टक्के वाढ झाली आहे. ही भरारी दिग्गज देशांना दिलेली चपराक म्हणावी लागेल. भारतीय विज्ञान संस्थेने मावळलेल्या वर्षात १४५ पेटेंट दाखल केले आहेत. यामुळे जागतिक नवोन्मेष निर्देशांकात २०१५ मध्ये ८० व्या स्थानावर असणारा भारत आज ४० व्या स्थानावर पोहचला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मते, आजघडीला देशार्तंगत पातळीवर नोंदल्या जाणा-या पेटेंटची संख्या ही परदेशात नोंदल्या जाणा-या पेटेंटपेक्षा अधिक आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेली एखादी गोष्ट पेटेंट करण्याची प्रक्रिया अलिकडच्या काळात वेगाने होऊ लागल्याने भारतात पेटेंट नोंदविण्याच्या बाबतीत जगात सातव्या स्थानावर आणि ट्रेडमार्क नोंदणीनंतर पाचव्या स्थानावर पोचला आहे. गेल्या पाच वर्षात भारताच्या पेटेंट नोंदणीत ५० टक्के वाढ झाली. यात प्रसिद्ध भारतीय विज्ञान संस्थानचे योगदान उल्लेखनीय आहे. या संस्थेने गेल्या वर्षात १४५ पेटेंट दाखल केले आहेत.
या प्रयत्नाचे फळ म्हणजे जागतिक नवोन्मेष निर्देशांकात २०१५ मध्ये ८० व्या स्थानावर असणारा भारत आज ४० व्या स्थानावर पोचला. या आधारावर आपण आगामी काळ हा तंत्रज्ञानाचा काळ म्हणून जगभरात ओळख निर्माण करू शकतो. भारतात गेल्या ११ वर्षांत प्रथमच देशांतर्गत पेटंट दाखल करण्याची संख्या विदेशी पेटंट दाखल करण्याच्या संख्येपेक्षा जास्त दिसून आली आहे. हे भारताच्या वाढत्या वैज्ञानिक सामर्थ्याचे निदर्शक आहे.
आज अनेक क्षेत्रांमध्ये देशार्तंगत पेटेंटची संख्या वाढत आहे. स्वदेशी उत्पादनावर दिला जाणारा भर आणि शोध वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे फळ म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. भारताने ‘ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी’ तयार करत जगभरातील ‘बायोपायरसी’च्या असंख्य प्रकरणातून बौद्धिक हक्क वाचविण्यात यश मिळवले. आयआयटीची संस्था असणा-या ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररीची स्थापना २००१ मध्ये भारताचे पारंपरिक ज्ञान वाचविण्यासाठी करण्यात आली. या संस्थेच्या स्थापनेनंतर पुदीना, कमळ, ब्राह्मी, अश्वगंधा, चहाची पाने, आलं आणि डझनभर औषधी वनस्पतींना विदेशी आक्रमणापासून वाचविण्यास यश मिळवले. पेटेंट मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो अणि ही सुविधा आता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. जगभरात अशीच सोय आहे. पण या अर्जात भारतीय पारंपरिक ज्ञानाचा वापर केला जात असल्याचे निष्पन्न होत असेल तर ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी ही तात्काळ कारवाई करते.
काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘दे धक्का’ या चित्रपटातूनही पेटंट मिळवण्याबाबतच्या उदासीनतेवर आणि त्याच्या फायद्यावर नेमकेपणाने प्रकाश टाकण्यात आला होता. त्यामागे पेटंटबाबत समाजातील संशोधकांमध्ये, अभ्यासकांमध्ये जनजागृती व्हावी हा हेतू होता. अशा प्रकारचे प्रबोधन मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे